सूर्यरश्मी
जशा भेदती मेघांस
ओलांडे देहास
ज्ञानी तसा..!
ज्ञानचक्षू लाभलेले योगी नित्य आत्मभावात
असतात हे सांगताना दिलेली उपमा-
ज्ञानें कां जयांचे डोळे । देखोनि न
राहाती देहींचे खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसे ॥ ३८२ /१५ तैसी
विवेकाचेनि पैसें । जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसें ।
आत्मयातें ॥ ३८३ / १५
ग्रीष्म ऋतूत सूर्याची किरणे जशी
मेघांचा अडसर दूर करून प्रकाशतात तसे ज्ञानी लोक देहाचा मधला अडसर बाजूला करून
नित्य आत्मस्वरूपच पाहतात.
No comments:
Post a Comment