विस्तार वडाचा
। वसे बीजामध्ये
आणि वडामध्ये
। वसे बीज..!
भक्त आणि ईश्वर
यांच्यातलं नातं समजावून सांगताना दिलेली उपमा-
सविस्तर वटत्व
जैसे । बीजकणिकेमाजी असे । आणि बीजकणु वसे । वटी जेवी ॥ तेवीं आम्हां तया परस्परें
। बाहेरी नामाचींचि अंतरे । वांचूनि आंतुवट वस्तु-विचारें । मी तेचि ते ॥ ४१०, ४११/९
संपूर्ण
वटवृक्षाचा विस्तार त्याच्या बीजामध्ये असतो आणि वटवृक्षामध्ये बीज वसलेले असते
तसे आम्ही परस्परांमध्ये सामावलेले असतो. बाहेर दिसणारे अंतर केवळ नामाचे असते.
No comments:
Post a Comment