घरट्यात जीव ।
ठेवून पक्षिण
आकाशी भ्रमण ।
करतसे..!
घाबरलेल्या अर्जुनाला विश्वरूपाचं
महत्त्व समजावून सांगताना दिलेली उपमा-
हें रूप जरी घोर । विकृति आणी थोर । तरी
कृतनिश्चयाचें घर । हेंचि करी ॥ ६३२/११
का
अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळा । पक्षिणी अंतराळा- । माजी जाय ॥ ६३४/११
पंख न फुटलेल्या पिलाजवळ जीव ठेवून
पक्षिण आकाशात झेपावते तसा तू आपला जीव माझ्या विश्वरूपाजवळ ठेव आणि मग माझ्या
मानवी रूपावर प्रेम कर. कारण विश्वरूप हेच माझे खरे रूप आहे.
No comments:
Post a Comment