Saturday 17 October 2015

गंध जाई दूर


गंध जाई दूर । फूल उरे मागे
देठामधे जागे । आत्मभान..!

परिमळु निघालिया पवनापाठी । मागे वोस फुल राहे देठी । तैसे आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥ येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्भावा । मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥  ४१३, ४१४/९
गंध वार्‍यावर दूर निघून गेला तरी देठाची पकड असेपर्यंत फूल देठावर राहाते. तसे आत्मज्ञान झाल्यावर जगण्यासारखे काही उरलेले नसताना भक्ताचे आयुष्य त्याचा देह धरून ठेवते..! एरव्ही त्याचा देहाहंकार ईशरूपात केव्हाच स्थित झालेला असतो.

1 comment:

  1. अप्रतिम ….
    हा ज्ञानाचा काव्य सुगंध मनात दीर्घकाळ दरवळत राहील ….

    ReplyDelete